कॉलेज

आठवणींचे अल्बम कधी कधी काढले जातात 
आयुष्याची पानं मनातल्या मनात उलटत राहतात 
नवीन चेहरे नेहमी शोधले जातात 
हरवलेले चेहरे मात्र लक्षात राहतात 

का जाणे तो सोनेरी क्षण सामोरे येतात? 
का त्या कॉलेज मध्ये सांडलेल्या आठवणी भेटत राहतात? 
का तो कॉलेजचा पहिला दिवस आठवणीत राहतो? 
का तो कॉलेजचा शेवटचा दिवस आयुष्याचा भाग बनतो? 

इथेच आपल्या स्वप्नांना पंख फूटतात 
आणि भरारी घ्यायला क्षितिजे कमी पडतात 
इथेच कोणीतरी वाटेवर अवचित भेटून जातो 
आयुष्यभराची स्वप्ने देऊन जातो 

का जाणे ते दिवस आपल्याला खुणवत राहतात 
कारण ते परत कधीही येणारे नसतात 
आठवणींचे अल्बम आता मिटले जातील 
कॉलेजच्या आठवणी मनात घर करून राहतील 
कवी -पांडुरंग कांबळे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बाप

ओलीचिंब

आमचा हि एक जमाना होता 💌