Posts

आमचा हि एक जमाना होता 💌

आमचाही एक जमाना होता   बालवाडी पासून च स्वतः च शाळेत जावे लागत असे ,  सायकलने/ बस ने  पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्या स काही बरे वाईट होईल अशी  भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.     पास / नापास हेच  आम्हाला  कळत होतं... %  चा   आणि आमचा  संबंध कधीच नव्हता   पुस्तकामध्ये झाडाची  पानं आणि मोरपिस ठेवून  आम्ही हुशार होऊ शकतो,  असा आमचा दृढ विश्वास  होता... ☺️☺️        कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं. 😁        दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि  वह्यांना कव्हर्स घालणे,  हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव  असायचा... 🤗  वर्ष सम्पल्यानंतर पुस्तके विकणे आणि  विकत घेण्यात  आम्हाला काहीही लाज वाटत नसे. 🤪        आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.    ...

बाप

Image
बाप स्वाभिमानी बाणा , बाप कणखर कणा  त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना  त्याची पहाडाची छाती,  त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाना, हिऱ्यामोत्याचा रुबाब...  बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल  बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल  बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर  जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर...    उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी  शिव्याशाप या जगाचे बाप घेतो सारे माथी  घर बायको नि मुले यांना जगवन्यासाठी  बाप होतो वेडापिसा एका एका पैश्यासाठी...    बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा  त्याच्या डोळ्यातील थेंब कोणा दिसणार कसा?  बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची  जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी...  ज्याने जपले मुलांना तळहाती पाकळ्यात  अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात... ! कवी -पांडुरंग सोनू कांबळे (B.A.in English )

कॉलेज

Image
आठवणींचे अल्बम कधी कधी काढले जातात  आयुष्याची पानं मनातल्या मनात उलटत राहतात  नवीन चेहरे नेहमी शोधले जातात  हरवलेले चेहरे मात्र लक्षात राहतात  का जाणे तो सोनेरी क्षण सामोरे येतात?  का त्या कॉलेज मध्ये सांडलेल्या आठवणी भेटत राहतात?  का तो कॉलेजचा पहिला दिवस आठवणीत राहतो?  का तो कॉलेजचा शेवटचा दिवस आयुष्याचा भाग बनतो?  इथेच आपल्या स्वप्नांना पंख फूटतात  आणि भरारी घ्यायला क्षितिजे कमी पडतात  इथेच कोणीतरी वाटेवर अवचित भेटून जातो  आयुष्यभराची स्वप्ने देऊन जातो  का जाणे ते दिवस आपल्याला खुणवत राहतात  कारण ते परत कधीही येणारे नसतात  आठवणींचे अल्बम आता मिटले जातील  कॉलेजच्या आठवणी मनात घर करून राहतील  कवी -पांडुरंग कांबळे 

ओलीचिंब

Image
चिंब ओली लाजरी ही तनु भासते  लोचनात या तुझ्या डुंबून जावे वाटते  जरी तुझ्या दूर मी वाटते समोर तु  मला कळेना कसे मनात श्वास दाटतो...  तुझा विचार स्पर्श तो मनास भेदतो जणू  तुझ्याच अंतरात मी सदासदा का छेदतो  चिंब ओली लाजरी तुझी तनु भासते...  किती असे सहायचे दूर दूर जायचे  दुःख अंतरातले कधी तुला कळायचे  भेदभाव सोड तु   सोड हे लाजणे  श्रावणात या सखे बरे नसे हे वागणे... !                                         कवी-पांडुरंग कांबळे ✍️