आमचा हि एक जमाना होता 💌
आमचाही एक जमाना होता बालवाडी पासून च स्वतः च शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बस ने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्या स काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही. पास / नापास हेच आम्हाला कळत होतं... % चा आणि आमचा संबंध कधीच नव्हता पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता... ☺️☺️ कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं. 😁 दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा... 🤗 वर्ष सम्पल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. 🤪 आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते. ...