ओलीचिंब

चिंब ओली लाजरी ही तनु भासते लोचनात या तुझ्या डुंबून जावे वाटते जरी तुझ्या दूर मी वाटते समोर तु मला कळेना कसे मनात श्वास दाटतो... तुझा विचार स्पर्श तो मनास भेदतो जणू तुझ्याच अंतरात मी सदासदा का छेदतो चिंब ओली लाजरी तुझी तनु भासते... किती असे सहायचे दूर दूर जायचे दुःख अंतरातले कधी तुला कळायचे भेदभाव सोड तु सोड हे लाजणे श्रावणात या सखे बरे नसे हे वागणे... ! कवी-पांडुरंग कांबळे ✍️